शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (08:08 IST)

राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे एलअँडटी कंपनीने तातडीने पूर्ण करावीत

shambhu raj desai
कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयात आढावा घेतला. मंत्री देसाई म्हणाले, नाडे, मल्हारपेठ, आडूळ, म्हावशी या गावातील अपूर्ण राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करावी. हेळवाक ते ढाणकल रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे. पाटण ते संगमनगर नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. तसेच कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे एलअँडटी कंपनीने तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना संबंधितांना मंत्री देसाई यांनी दिल्या.
 
या बैठकीस जिल्हाधिकारी सातारा रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Edited by : Ratnadeep Ranshoor