शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (11:33 IST)

महिलेच्या अंगावरून गेली बस

ठाणे शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात महिलेच्या अंगावरून बस गेल्याचे समोर येत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एक महिला रस्ता ओलांडत असताना तिच्या अंगावरून बस गेली ज्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेत महिलेचा पाय बस खाली चिरडल्याने तिचा पाय तुटला आहे.
 
ही घटना 11 जानेवारी रोजी घडली आहे. ठाणे शहरात टीएमटीने बसने महिलेला धडक दिल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे एकूण तीन महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे. पहिली महिला सुरक्षित रस्ता ओलांडते मग नंतर पाठोपाठ दोन महिला रस्ता ओलांडत असताना समोरून बस येत असल्याचे बघून त्या रस्त्याच्या कडेला थांबतात. यावेळी एक महिला थोडी पुढे तर एक महिला मागे थांबलेली दिसत आहे. तेव्हा अचानक बसने साईडला वळन घेत असताना ड्रायव्हरला अंदाज येत नसल्याने बस थेट महिलेला धडकते आणि महिला बस खाली पडल्याने तिच्या पायावरून जाते.