रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (10:20 IST)

राज ठाकरे ठाण्यातल्या सभेतून 'करारा जवाब देणार'

Raj Thackeray
गुढीपाडव्याला शिवाजी पार्क इथे झालेल्या सभेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी ठाण्यात सभा घेत आहेत. या सभेचा ट्रेलर मनसेनं जारी केला आहे. उत्तर सभा असं या सभेला नाव देण्यात आलं असून 'करारा जवाब मिलेगा' असंही यात म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला या सभेत राज ठाकरे उत्तर देणार आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला होता. तसेच मदरशांमधले गैरप्रकाराबाबत वक्तव्य केले होते. यानंतर महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
 
भाजप-मनसे युतीची चर्चा, हिंदुत्ववादी भूमिका, कार्यकर्त्यांची नाराजी अशा विषयावर राज ठाकरे हे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.