शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (15:08 IST)

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवरून केंद्र सरकार आणि मुंबई मनपा आमने सामने; काय आहे हा वाद?

corona
मुंबईमध्ये XE या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याचा मुंबई महापालिकेचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला योग्य वाटत नाहीये. यावरून केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आमनेसामने आले आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये संबंधित रुग्णात XE हा सब व्हेरिएंट आढळला नाही, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे.मुंबईतील एका ५० वर्षी महिलेला कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. तिला XE या नव्या व्हेरिएंटची बाधा झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल महापालिकेने दिला आहे. कोरोनाबाधित महिलेने लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. नव्या व्हेरिएंटची पुष्टी करण्यासाठी संबंधित नमुना पुढील विश्लेषणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स (एनआयबीएमजी) कडे पाठविण्यात येणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. बीएमसीच्या या दाव्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. परंतु तो हा नवा व्हेरिएंट नाही असा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
 
– हा व्हेरिएंट आतापर्यंतचा सर्वाधिक संक्रामक कोविडचा प्रकार असू शकतो.– XE सब व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या बीए.२ च्या तुलनेत १० टक्के अधिक संक्रामक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.– डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटचाच भाग म्हणून XE म्युटेशन ट्रॅक केला जात आहे. ताप, घसा दुखणे, खोकला, सर्दी, त्वचेत जळजळ होणे ही ओमिक्रॉनची लक्षणे आहेत.– १९ जानेवारी रोजी यूकेमध्ये हा व्हेरिएंट आढळल्यानंतर त्याचे ६३७ रुग्ण आढळले होते.– यूकेचा आरोग्य विभाग XD,XE, XF चा अभ्यास करत आहे. ओमिक्रॉनच्या BA.1 मधून XD चा जन्म झाला आहे. तर XF हा डेल्टा आणि BA.1 च्या पुनर्संयोजनातून निर्माण झाला आहे.– थायलंड आणि न्यूझीलंडमध्येसुद्धा XE व्हेरिएंट आढळला आहे. XE बद्दल बोलण्यापूर्वी त्याच्याबद्दलचा आणखी डेटा मिळवणे आवश्यक आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.– XE हा व्हेरिएंट गंभीर असल्याबद्दलचे कोणतेही पुरावे अद्याप मिळाले नाहीत. आतापर्यंत ओमिक्रॉनच्या रुग्ण गंभीर नसल्याचे दिसून आले आहेत.