1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (20:24 IST)

कल्याणच्या रेल्वे शाळेत विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली

Students take Pledge at Railway School
कल्याणच्या रेल्वे शाळेत दोन वर्षांनंतर एक सुंदर दृश्य दिसले.तब्बल दोन वर्षानंतर नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी उत्साही विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आता सर्व निर्बंध काढण्यात आले आहे. आणि थांबलेले जीवन पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. कल्याणच्या रेल्वेच्या शाळेत दोन वर्षांनंतर सुंदर दृश्य पाहायला मिळाले.

नवीन शैक्षिणक सत्र सुरु होण्यापूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसला आणि या उत्साही विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.