मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (17:36 IST)

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर ईडीची कारवाई, संपत्ती जप्त केली

sanjay raut
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात येण्याचे सांगण्यात आले आहे. .
 
संजय राऊत यांची अलिबाग येथील संपत्तीही ईडीने जप्त केली आहे.अलिबाग येथील 8 भूखंड आणि दादर येथील फ्लॅट ईडीने जप्त केल्याची माहिती मिळते आहे, तसंच 1हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणीही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
 
संजय राऊत यांनी संपत्ती जप्त केल्यानंतर ट्वीटरवर  'असत्यमेव जयते!' असं ट्वीट त्यांनी करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "अशा कारवायांपुढे शिवसेना झुकणार नाही. मी कष्टाने कमवलेली संपत्ती आहे. माझा गुन्हा सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन." ईडीने नोटीस न देता ही मालमत्ता जप्त केल्याचंही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
 
यापूर्वी ईडीच्या धाडी आणि तपासाबाबत संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर करण्यासाठी वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले होते..
 
"दादरसाख्या भागात माझं फार फार तर टू रुम किचनचं घर आहे. एखाद्या मराठी माणसाचं असतं तसं. अलिबागला माझं गाव आहे. तिकडे साधारण 50 गुंठ्याची जमीन आहे. याला कोणी संपत्ती म्हणत असेल तर तेवढी संपत्ती आहे." माझी संपत्ती कष्टाच्या पैशांची आहे. हा राजकीय दबाव आहे,"असं संजय राऊत म्हणाले.