प्रवीण दरकेर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात
भाजप नेते प्रवीण दरेकर चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यावर मुंबई बँकत मजूर असल्याची नोंद करून संचालक मंडळावर गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.
ते चौकशीसाठी हजेर झाले असता पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि जोरदार घोषणाबाजी केली. दरेकर यांनी आपले म्हणने मांडले आहे. मुंबई बँकेची निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.
मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून निवडणूक लढवली आणि बिनविरोध निवडून आले होते. मात्र, मुंबई सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवले होते. 1997 पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली त्यामुळं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.