शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (10:29 IST)

मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांना नोटीस

मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात मुंबई पोलीस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी यासंदर्भात दरेकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
त्यांना सोमवारी (4 एप्रिल) मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्या आदेश देण्यात आले आहेत.
 
मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.