रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (17:11 IST)

भोंग्यावरून राजकारण तापलं, मनसे कार्यालय बाहेरील भोंगे, स्पीकर पोलिसांनी जप्त केले

काल शनिवारी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनसेचा मुंबईच्या शिवाजी पार्क येथे मेळाव्याचे आयोजन झाले. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण दिले. या भाषणात त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवून टाका नाहीतर मशिदी समोर मोठ्याने लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू. असा इशारा दिला होता. 
 
या भाषणाचे पडसाद आता पाहायला मिळत आहे. आता त्या वरून मुंबईतील चांदीवली येथील विधानसभा मतदार संघातील विभागाचे अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी मनसेच्या कार्यालयावर भोंगे लावून त्यावर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली. भोंगे काढा अशी समज महेंद्र यांना चिरागनगर पोलिसांनी दिली. 
 
तरी ही त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे कार्यालयाच्या समोर असलेल्या झाडावर लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली. त्यांनी पोलिसांनी समज देऊन देखील भोंग खाली उतरवले नाही म्हणून पोलिसांनी येऊन ते भोंगे खाली काढले आणि कार्यालयातील स्पीकर जप्त करत विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले आहे. 
 
'मी मनसेचा कार्यकर्ता असून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आदेशाचं पालन करत आहे. आणि ते माझं कर्तव्य आहे'. म्हणून मी लाऊड स्पीकरवर आरती आणि धार्मिक मंत्र, हनुमान चालीसा लावत आहे. माझ्या असं केल्याने तणाव कसा निर्माण होणार. अजान केल्यावरून तणाव निर्माण होत नाही. तर मग हनुमान चालीसा लावल्यामुळे तणाव कसा काय निर्माण होणार?  असं त्यांनी म्हटले आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता असून या परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.