गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (22:42 IST)

युवासेनेचे महागाई विरोधात थाली बजाओ आंदोलन

महागाई विरोधात युवासेनेच्यावतीने राज्यात महागाई विरोधात 'थाली बजाओ' आंदोलन करण्यात आले. मुंबईत युवासेनेसोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कार्यकर्त्यांसोबत जोरदार निदर्शने केली. यासोबत कल्याण डोंबिवली, रत्नागिरी, बीड, नंदुरबार जिल्ह्यात देखील आंदोलन करण्यात आले.
 
म म मोदींचा, म म महागाईचा, देश चलाये संता बंता, बेहाल हो गई जनता, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत वाढती महागाई विरोधात डोंबिवलीत युवा सेनेने आंदोलन केलं. पेट्रोल डिझेल सोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात देखील भरमसाठ वाढ होत असून वाढत्या महागाईच्या निषेधार्थ डोंबिवलीत शिवसेना युवा सेनेच्या वतीने थाळी बजाओ खुशीया मनाओ आंदोलन करण्यात आले.