शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (12:14 IST)

एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे; हायकोर्टाचे आदेश

मुंबई हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे. तसंच कर्मचाऱ्यांना पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देत सेवेत सामावून घ्यावे असे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत.
 
या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचंही कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. संपादम्यान ज्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले ते मागे घेणार नाही, अशी भूमिका महामंडळाने मांडली मात्र ते मागे घेण्याबाबत आम्ही आदेश देऊ असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
 
कोर्टाने म्हटले की आम्हाला या संपामुळे एकही मृत्यू झालेला नको आणि सिंह आणि कोकरूच्या वादात आम्हाला कोकरूला वाचवावे लागेल असं सांगितलं. कोर्टाने कर्मचाऱ्यांना कोविडचा भत्ता देण्यासही सांगितलं असल्याची माहिती संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. एका कर्मचाऱ्याला 300 रुपये प्रमाणे प्रत्येकी 30 हजार देण्यास सांगितलं.