मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (12:56 IST)

CNG Price: पुन्हा एकदा वाढली किंमत, जाणून घ्या नवे दर

cng gas
भारतीय बाजारपेठेत वाहनांच्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असतानाच सीएनजीवरही महागाईने आक्रमण केले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमतीत आज पुन्हा 2.50 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. 
 
पेट्रोल-डिझेलपासून ते सीएनजीपर्यंतचे दर वाढले आहेत
पेट्रोल-डिझेल ते सीएनजीचे दर झपाट्याने वाढत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजी गॅसच्या दरात 2.50 रुपयांनी वाढ केल्यानंतर आता ती 66.61 रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या 5 दिवसांत सीएनजी 6.60 रुपये किलोने महागला आहे. तर 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. वाहनांच्या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जनता हैराण झाली आहे.
 
राजधानी दिल्लीतील किंमत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दोन्ही वाहनांच्या इंधनाच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. यासह देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.