रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (12:22 IST)

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी गेल्या 15 दिवसांत 13व्यांदा इंधनाच्या किमती वाढवल्या

Petrol-Diesel Price Today 2022: पेट्रोल-डिझेलची आजची किंमत 2022: सरकारी तेल कंपन्यांनी आज, मंगळवार, 5 एप्रिलसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज 5 एप्रिल रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण झाली आहे.
 
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली. या दरम्यान, 24 मार्च आणि 01 एप्रिल वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, 15 दिवसांत पेट्रोलच्या दरात 13 हप्त्यांमध्ये अनुक्रमे 80, 80, 80, 80, 50, 30, 80, 80, 80, 80, 80, 40 आणि 40 पैशांनी वाढ झाली आहे. अशाप्रकारे पेट्रोल 8 रुपये 80 पैशांनी महागले आहे.
 
आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 118.83 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तिथे आता डिझेल 103.07 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर आता  
 
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थानिक करांच्या आधारावर राज्यांमध्ये बदलतात. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये 100 रुपयांच्या पुढे डिझेल विकले जात आहे.