गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (10:55 IST)

धक्कादायक ! तरुणाने घरात रॉकेट सोडले, ठाण्यातील घटना

यंदा सर्वत्र दिवाळीचा सण दणक्यात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. लोक सणाचा आनंद घेत आहे. सर्वत्र रोषणाई आणि आतषबाजी सुरु आहे. फटक्यांचा आवाज दणक्यात आणि जोरदार सुरु आहे. काही लोक दिवाळीत फटाके सोडताना काळजी घेत नाही. स्टंटबाजी करतात या मुळे अपघात होतात. काहींना गंभीर दुखापत होते , काहींना डोळ्यांना त्रास होतो. तर काहींना जीवाला मुकावे लागतात. काही जण फटाके उडवताना स्वतःचा जीव तर धोक्यात घालतात पण इतरांच्या जीवाशी देखील खेळ करतात. असाच एका तरुणाचा जीवघेणा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ठाण्याच्या उल्हासनगर मधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण बिल्डिंग खाली उभारून रॉकेट उडवत आहे. मुख्य म्हणजे त्याने रॉकेट आपल्या हातात धरला आहे. तो रॉकेट पेटवून थेट बिल्डिंगवर सोडतो. तो हे रॉकेट बिल्डिंगच्या प्रत्येक घरात सोडत असताना दिसत आहे. या प्रकारामुळे बिल्डिंगचे सर्व रहिवाशी गोंधळलेले आणि घाबरलेले आहेत. त्याच्या अशा वागण्यामुळे मोठा अपघात होऊ शकत होता. काही लोकांनी त्याच्या या प्रकाराचा व्हिडीओ बनवून सोशलमिडीयावर शेअर केला आहे. पोलिसांच्या ही बाब समजल्यावर पोलिसांनी त्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शोध घेत आहे. 

Edited By - Priya Dixit