बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (15:10 IST)

ठाण्यात गोळीबार, दोन गटांत संपत्तीचा वाद, एक जखमी

ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेत एकजण जखमी झाली आहे. दोन गटांमधील संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घंटाळी मंदिर परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. दोन गटांमधील वाद सोडवणाऱ्या व्यक्तीवर हा गोळीबार झाला आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याचे समजते. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्यावेळी त्याचे सहकारी देखील होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी ते कंदील पुरवण्याचं काम करत होते. यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor