सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (11:48 IST)

नवनीत राणा यांच्या अजामीनपात्र वारंटवर कारवाई !

Navneet Rana
नवनीत राणा या नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात त्यांच्या विरोधात शिवडी महदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वारंट जाहीर केले होते. न्यायालयानं त्या वॉरंट वर कारवाई करण्याचे आदेश दिले. या अजामीनपात्राच्या विरोधात याचिका मुंबई सत्र न्यायालयात नवनीत राणा यांनी दाखल केली असून त्यावर मुंबई सत्र न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याने या अजामीनपात्र वारंटवर कारवाई करण्याचे आदेश शिवडी कोर्टाने पोलिसांना दिले असून नवनीत राणा यांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनवाई 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणामुळे  नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 
 
Edited By- Priya Dixit