1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (10:45 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर, केदारनाथ धाम पोहोचले, दिलेलं वचन पाळलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून सर्वप्रथम त्यांनी केदारनाथ धाम ला दाखल झाले. त्यांनी प्रथम बाबा केदार यांचे दर्शन व पूजा केली.यानंतर त्यांनी केदारनाथ रोपवेची पायाभरणी केली.आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण केला.दरम्यान, त्यांनी घातलेल्या पोषाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.हिमाचल प्रदेशातील एका महिलेने हाताने बनवून पंतप्रधानांना भेट दिल्याचे सांगितले जात आहे.
 
पंतप्रधान मोदी यांनी नुकताच हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता.यादरम्यान एका महिलेने त्यानां हिमाचलचा खास चोला डोरा पोशाख भेट दिला.चंबा येथे राहणाऱ्या एका महिलेने स्वत:च्या हाताने हे पोशाख बनवले आहे.त्यावर उत्कृष्ट हस्तकला आहे.पंतप्रधानांनी महिलेला वचन दिले होते की ती जेव्हाही थंड ठिकाणी जाईल तेव्हा ते हा पोशाख नक्कीच घालतील. केदारनाथ धामच्या भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी महिलेला दिलेले वचन पाळत हा खास पोशाख घातला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी उत्तराखंडमध्ये पोहोचले आहेत.त्यांचा हा दौरा विशेष मानला जातो.पंतप्रधान राज्याला 3400 कोटींच्या योजना भेट देणार आहेत.ते आज भारतातील शेवटचे गाव माणा येथेही भेट देणार आहेत. या ठिकाणी ते एका जाहीर सभेला संबोधित करतील.हे गाव चीनच्या सीमेवर आहे.ते बद्री विशाल येथे रात्री मुक्कामी असतील. 
 
Edited By- Priya Dixit