सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (16:55 IST)

आंबा खावून मुले होतात भिडे यांचा अजब दावा

कोण काय दावा करेल हे सागता येत नाही. भीमा कोरेगाव दंगलीने सर्व पुन्हा एकदा सर्वांसमोर आलेले संभाजी भिडे यांनी अजब शोध लावला आहे. त्यांच्या नुसार माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली होती. यावेळी भिडे यांनी म्हटले की, माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले. संभाजी भिडे यांना पूर्ण राज्यातून पुरोगामी संघटना विरोध करत आहेत. त्यामुळे जेथे जेथे सभा होते तेथे पोलिस बंदोबस्त असतो तर अनके कायकर्ते त्यांना विरोध करत आहे. भिडे यांच्या अटकेची मागणी सर्वत्र होत आहे.