1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जून 2018 (17:27 IST)

१० वीचा निकाल, राज्यात ३३ शाळांचा निकाल शून्य टक्के

10th ssc result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १० वी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील ९ विभागीय परीक्षा मंडळातील २१,९५७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. राज्यातील ४०२८ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. तर ३३ शाळांचे निकाल चक्क शून्य टक्के लागला आहेत.
पुणे विभागातील ३ शाळा, नागपूर विभागातील ४ शाळा, संभाजीनगर विभागातील ९ शाळा, मुंबई विभागातील ५ शाळा, अमरावती विभागातील २ शाळा, नाशिक विभागातील ४ शाळा, लातूर विभागातील ६ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. कोकण आणि कोल्हापूर विभागातील एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही.

 
पुणे विभागातील ७६० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नागपूर विभागातील ३४५ शाळांचा, संभाजीनगर विभागातील ३३५ शाळांचा, मुंबई विभागातील ८१६ शाळांचा, कोल्हापूर विभागातील ६८१ शाळांचा, अमरावती विभागातील २९७ शाळांचा, नाशिक विभागातील ३६८ शाळांचा, लातूर विभागातील १७७ शाळांचा, कोकण विभागातील २४९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.