मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2023 (16:42 IST)

नवरी डान्स करताना स्टेजला आग, तरुण विझवायला धावला, त्याच्यासोबत जे झालं ते अधिकच भयंकर

अनेकवेळा असे घडते की जेव्हा एखाद्याच्या मदतीसाठी धावणार्‍या व्यक्तीसोबतच काई वाईट गोष्टी घडतात. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला, लग्नाच्या दिवशी वधू स्टेजवर डान्स करत असताना अचानक स्टेजला आग लागली. यावेळी सर्वजण आग विझवण्यासाठी स्टेजकडे धावले. दरम्यान आग विझवण्यासाठी समोरून धावलेल्या एका मुलाचे जे झाले ते कदाचित तिथे लागलेल्या आगीपेक्षा भीषण असेल. व्हिडिओमध्ये पहा त्या मुलाचे काय झाले.
 
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू स्टेजवर जबरदस्त स्वॅगसह नाचत आहे. तेव्हाच लोक दिसतात आणि स्टेजवर आग लागल्याचे कळते. नववधूही आपले नृत्य थांबवते आणि आगीकडे पाहू लागते. तेथे उपस्थित सर्व लोक आग विझवण्यासाठी धाव घेतात. स्टेजवर ठेवलेल्या खुर्चीवर चढताच आग विझवण्यासाठी सर्वात आधी धावणाऱ्या एका मुलाचा तोल सुटला आणि स्टेजच्या पाठीमागे चेहऱ्यावर गंभीरपणे पडला. त्याला किती दुखापत झाली हे कळू शकले नाही. पण रंगमंचावर एवढी छोटीशी आग विझवण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कसे धावत आहेत आणि कुणी फुलांनी, कुणी पुष्पगुच्छ देऊन आग विझवत आहेत हे बघायला मिळतं.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by veshu (@veshu4600)

लोकांना हा व्हिडीओ पाहणे खूपच मजेदार वाटत आहे. आग विझवणाऱ्या मुलासोबत लोकही खूप मजा करत आहेत. हा व्हिडिओ veshu4600 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत.