शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (16:40 IST)

मंदधुंद नवरदेव नवरी ऐवजी सासूशी लग्न करायला निघाला

लग्नात गमतीदार किस्से होतातच आणि त्याची आठवण नेहमी साठी राहते. खरं तर लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी लग्नातील गमती जमती चे किस्से ते क्षण व्हिडीओ मध्ये किंवा कैमेऱ्यामध्ये कैद होतात. सध्या एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओ मध्ये लग्नाच्या वेदीवर चढलेल्या चढलेले वर वधू उभे आहे. हातात हार घेतलेल्या नवरदेवानी मंदधुंद अवस्थेत नवरी ऐवजी चक्क आपल्या सासूला हार घालत आहे. नवरदेव एवढा नशेत आहे की त्यालाच त्याचे काहीच कळत नाहीये की आपण काय करत आहोत. तो नशेत नवरी ऐवजी आपल्या सासूला हार घालायला जातो तेवढ्यात त्याला त्याच्या शेजारी उभे लोक अडवतात. आणि नवरीला हार घालण्यास सांगतात. लोकांचे ओरडणे ऐकून मोठ्या कष्टाने तो नवरीच्या गळ्यात हार घालतो. 

या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की नवरदेव इतक्या नशेत आहे की त्याला त्याचा तोल सांभाळणे कठीण होत आहे. व्हिडीओ कुठला आहे अद्याप समजू शकले नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.