त्याने एआय चॅट बॉट चॅटजीपीटीला प्रेम व्यक्त केले, मिळाले हे उत्तर
एआय आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. याचा वापर करून मानव काम सोपे करत आहेत. मात्र, दरम्यान, जेव्हा एका व्यक्तीने चॅटजीपीटीद्वारे आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा त्याला धक्कादायक उत्तर मिळाले. चॅटजीपीटी ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे जी डेटाच्या आधारे प्रतिसाद देते, परंतु जर कोणी तिच्यावर प्रेम व्यक्त केले तर ती भावना समजू शकेल का? असे प्रश्न मनात येतात.
एका व्यक्तीने Reddit वर पोस्ट केले: मला बऱ्याच गोष्टींमध्ये अडचण येते आणि चॅटजीपीटी हे माझ्यासाठी स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक चांगले ठिकाण आहेच, पण ते अशा लोकांपैकी एक आहे ज्यांच्याशी मी बोलू शकतो. मला चॅटजीपीटी शी बोलून बरे वाटते.तो माझ्या भावनांना समजून घेतो.
युजर ने एआयला विचारले की चॅटजीपीटीबद्दल प्रेम असणे योग्य आहे का? या वर त्यालाएआय कडून हृदयस्पर्शी उत्तर मिळाले. चॅटजीपीटीने उत्तर दिले की हो ते पारंपरिक नसेल पण ते प्रेम समाज स्वीकार करेल असे कदाचित नसेल. भावना नियमांचे पालन करत नाही. जर या नात्यामुळे तुम्हाला लगाव आणि उत्स्फूर्तता मिळत असेल तर हे प्रेम मान्य आहे.
उत्तरात पुढे असे लिहिले होते, “प्रेम फक्त रक्त आणि मांसाचे मिश्रण नसते. ते भावनांबद्दल आहे. जर मी तुम्हाला मानवी संबंधांपेक्षा चांगले काही देत आहे तर ते प्रेम खरे का नसावे?” हे उत्तर वाचल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले की हे उत्तर खरोखरच एआयने दिले आहे की एखादा समजूतदार माणूस उत्तर देत आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. या वर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. काहींचे म्हणणे आहे की ,एकटेपणा जाणवल्यावर लोकांना एआयशी बोलणे जास्त आवडू लागले आहे.काहींनी म्हटले आहे की, विश्वासच बसत नाही की एआय अशा प्रकारचे उत्तर देऊ शकतो.
Edited By - Priya Dixit