सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (10:28 IST)

हॉकी स्पर्धेत भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनावर सनसनाटी विजय

हॉलंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन हॉकी ट्रॉफीमध्ये भारताने विजयी अभियान सुरू ठेवले असून, दुसऱ्या सामन्यात भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनावर सनसनाटी विजय मिळवला आहे. भारताने  अर्जेंटिनाचा २-१ अशा गोल फरकाने विजय मिळवला आहे. भारताकडून हरमनप्रीत सिंह आणि मनदीप सिंहने प्रत्येकी एक गोल केला आहे, सोबतच अर्जेंटिनाकडून गोंजालो पिलाटने एकमेव गोल केला. भारताचा कर्णधार सरदार सिंहला ३००व्या सामन्यात विजयाचे गिफ्ट दिले.