व्यक्त व्हा, महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत - गुलजार
कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येसंदर्भात भाष्य करत गुलजार म्हणाले आहेत की पश्चिम बंगालमधील उच्चभ्रू बुद्धिवंतांप्रमाणे महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेत नाहीत, त्या कारणाने महाराष्ट्रात परखड विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची हत्या होत आहे. ज्येष्ठ गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी व्यक्त केले. त्यांनी 'द वॉल' ला मुलाखत दिली आहे. पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतील विचारवंतांच्या मानसिकतेवर गुलजार यांनी बोट ठेवले. एखादी घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्यानंतर तेथील विचारवंत त्यावर व्यक्त होतात. प्रसारमाध्यमेही त्याला प्रादेशिक प्रसिद्धी देतात. राज्यातील जनतेला त्यामुळे या विचारवंताविषयी माहिती असते. एखाद्या घटनेनंतर महाराष्ट्रातील लोक फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असताना कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्यासारखे विचारवंत परखडपणे बोलतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. हे सहन न झाल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे गुलजार यांनी सांगितले आहे. प्रथमच इतका मोठा कलाकार, कवी ज्याने आपले असे परखड मत मांडले आहे.