मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: ग्वालियर , सोमवार, 21 मे 2018 (14:41 IST)

द बर्निंग ट्रेन : आंध्रप्रदेश एक्सप्रेसच्या 4 डब्यांना आग

fire broke out 4 coaches
आंध्रप्रदेश एपी एसी एक्सप्रेसच्या डब्यात अचानक सोमवारी दुपारी किमान 12 वाजता आग लागली. ट्रेन चालकाच्या तर्कशक्तीमुळे मोठा अपघात होता होता वाचला. मिळालेल्या वृत्तानुसार ग्वालियर रेलवे स्टेशनवर एपी एसी एक्सप्रेसच्या बी-6 आणि बी-7 डब्यात आग लागली. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 
 
सुरुवातीला आंध्र प्रदेश एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. त्यानंतर ही आग आणखी दोन डब्यांपर्यंत पोहोचली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. ही एक्सप्रेस निजामुद्दीनहून विशाखापट्टणमला जात होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाल्याची माहिती मिळते आहे.