सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या कारला अपघात

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारला अपघात झाला. लोणावळा येथे त्यांच्या कारला हा अपघात झाला. ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असतानाच हा अपघात झाला.
 
लोणावळ्याच्याच रस्त्यावर असतेवेळी एका टेम्पोला ही कार धडकली आणि हा अपघात झाला. अपघात झालेल्या कारचे फोटो पाहिले असता त्याची भीषणता लक्षात येत आहे. एका बाजुला दरी असल्यामुळे हा अपघात अतिशय भीषण असल्याचं असल्याचं अनिकेतने सांगितलं.  रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असतानाच अचानकच बंद पडलेला टेम्पो समोर आला आणि त्या टेम्पोपासून वाचण्यासाठी म्हणून चालकाने कार वळवली पण, त्याचा कारवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.  
 
‘आम्ही दोघंही सुखरुप आहोत. असं असलं तरीही प्रार्थनाच्या हाताला उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर तिच्या असिस्टंच्या डोक्याला मार लागला आहे’, असं तो म्हणाला. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये अनिकेत, प्रार्थना, प्रार्थनाची असिस्टंट आणि चालक असे चौघेजण उपस्थित होते.