सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (15:34 IST)

भारतातील असे गाव जिथे लोक चपला आणि बूट घालत नाहीत, जाणून घ्या यामागचे कारण

आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या शरीराचे आणि पायांचे संरक्षण करण्यासाठी चपला किंवा बूट घालतात. आजच्या काळात शूज आणि चप्पलशिवाय कोणीही आपले पाय सुरक्षित ठेवू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात एक गाव आहे जिथे लोक बूट किंवा चप्पल घालत नाहीत. भारतातील या गावात शूज आणि चप्पल न घालण्यामागे एक खास कारण सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की इथले लोक शूज आणि चप्पल का घालत नाहीत.
 
आजकाल प्रत्येक व्यक्ती आपले पाय सुरक्षित ठेवण्यासाठी शूज आणि चप्पल घालतो. भारतात बहुतेक ठिकाणी लोक घरात देखील चप्पलशिवाय राहत नाही. मात्र मंदिर असो किंवा इतर धार्मिक स्थळ किंवा स्वत:च्या किंवा एखाद्याच्या घराबाहेर किंवा दाराजवळ चपला काढून ठेवण्याची देखीय सवय बघण्यात येते. मात्र दक्षिण भारतात एक गाव आहे जिथे लोक कधीच बूट आणि चप्पल घालत नाहीत. त्यापैकी काही लोक गावाची हद्द पार केल्यावरच चपला घालतात. भारतातील या गावाचे नाव अंदमान आहे, जे तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून 450 किलोमीटर अंतरावर आहे.
 
एका अहवालानुसार, अंदमानच्या या गावातील बहुतेक लोक शेतकरी आहेत आणि शेतात मजूर म्हणून काम करतात. पण या गावात कोणीही शूज आणि चप्पल घालून जात नाही. अति उष्णतेमध्ये सुद्धा लोक अनवाणी पायाने फिरतात. इथली मुलंही शूज-चप्पलशिवाय शाळेत जातात. मिळालेल्या माहितीनुसार, या गावाचे संरक्षण मुथ्यलम्मा नावाच्या देवीने केले आहे. त्यामुळे येथील लोक शूज आणि चप्पल घालत नाहीत. लोक जसे चपला-चप्पल घालून मंदिरात जात नाहीत, तसे ते या गावालाही मंदिर मानतात. गावाच्या बाहेर पडायचे असल्यास या गावाच्या हद्दीत हातात चप्पल घेऊन फिरतात आणि हद्दीतून बाहेर पडल्यावर चप्पल घालतात.
 
या गावात बाहेरून कोणी आले की, गावकरी लोकांना या प्रथेविषयी किंवा श्रद्धा सांगतात. बाहेरचे लोक चप्पल काढायला तयार असतील तर लोक खुश होतात आणि कोणी तयार नसेल तर त्याच्यावर दबाव आणला जात नाही. मार्च-एप्रिलमध्ये तीन दिवस ग्रामदेवतेची पूजा केली जाते.