1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 14 मार्च 2018 (10:34 IST)

रिलायन्स जिओमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध

jobs for reliance jio
रिलायन्स इंडस्‍ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओने अलिकडेच आवेदन जाहिर करून पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. जिओने आपल्या वेबसाईटवरुन कोणत्या कॅटेगरीत नोकरीची संधी आहे, हे जाहिर केले आहे. 
  • संस्थेचे नाव- रिलायन्स जियो इंफोकॉम लिमिडेट
  • पद- ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी
  • योग्यता- कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा युनिव्हर्सिटीतून BE/B.Tech ची पदवी
  • अनुभव- प्रेशर
  • पगार- याचा खुलासा करण्यात आलेला नाही
  • लोकेशन- नवी मुंबई
  • निवड प्रक्रीया- मुलाखतीवरून होणार निवड
  • कसा कराल अर्ज- रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाईटवर जावून करा अर्ज.

जिओ.कॉम आणि करिअर.जिओ.कॉम वर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करु शकतात. यासाठी सर्वात आधी तुम्हाला रजिस्टर करावे लागेल. रजिस्टर करताना तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून कन्फर्मेशन मिळेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला करिअर.जिओ.कॉम वर लॉग इन करावे लागेल.