सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (14:40 IST)

Video फोनवर बोलताना बिल्डिंगवरून उडी मारली

परिस्थितीसमोर माणूस जेव्हा पराभूत वाटू लागतो, तेव्हा हे जीवन त्याला ओझं वाटू लागतं. त्यामुळे तो आत्महत्या करतो. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात एक व्यक्ती थेट आत्महत्या करत आहे. असाच एक व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्या व्यक्तीने हे का केले याचा तपशील समोर आलेला नाही, पण तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही पाहणार आहात ते तुम्हाला नक्कीच धक्का देईल.
 
माणसाने उंच इमारतीवरून उडी मारली
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सर्वात उंच इमारतीच्या बॉर्डरवर उभा आहे आणि फोनवर बोलत आहे. अचानक तो इमारतीच्या खाली उडी मारतो. खाली उडी मारल्यानंतर तो माणूस छताला पकडण्याचा प्रयत्न करतो परंतु हात गमावतो आणि वाहनांच्या मध्ये थेट रस्त्यावर पडतो. नऊ सेकंदाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हादरुन जाऊ शकता.
 
व्हायरल व्हिडिओ
@1000 WAYS TO DIE नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावर अनेक लाईक्स, व्हयूज आणि कमेंट्स येत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला.