गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

केदारनाथ मंदिराचे दार सहा महिन्यानंतर उघडले

Kedarnath Temple Reopens After Six Months
उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला.  राज्यपाल केके पॉल आणि विधानसभा अध्यक्ष प्रेम चंद अग्रवाल यांनी सर्वात प्रथम दर्शन घेतलं. यानंतर सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. यंदा जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असल्याची माहिती बदरीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. सिंह यांनी दिली. 
 
मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी विधीवत पूजा अर्चा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला. यावेळी भक्तांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष सोय देखील केली होती. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.