शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (15:19 IST)

चालत्या कार वर वीज पडली, व्हिडीओ व्हायरल

Lightning struck moving car
सध्या पावसाळा सुरु आहे. या दिवसात वीज कोसळण्याचा घटना घडतात. अपघात कुठे आणि कधीही होऊ शकतात. अनेकदा लोक मदतीला जात नाही तर व्हिडीओ बनवतात. पण या जगात अजून देखील काही अशी लोक आहे जे मदतीला धावून जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात एका कारवर  वीज कोसळते आणि कारमधील लोकांना वाचवण्यासाठी लोक धावून येतात आणि त्यांचा जीव वाचवतात. 

ट्विटर अकाउंट @OTerrifying वरून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून  त्यात दिसत आहे की, चालत्या कारवर वीज कोसळते आणि त्यातून धूर निघत आहे. वाहन चालक कार थांबवतो आणि त्यामधील बसलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी काही भागातील रहिवासी धावत येतात आणि कर मध्ये बसलेल्या लोकांना वाचवण्यात यश मिळवतात. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit