1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
  4. Alien Child Birth A woman gave birth to an alien like child

Alien Child Birth : महिलेने दिला एलियन सदृश मुलाला जन्म

social media
एखादी स्त्री जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा ती देखील आई म्हणून जन्म घेते. मूल कसे ही असो, ते आईला नेहमीच प्रिय असते आणि आई त्याला छातीशी धरून घट्ट मिठी मारते. पण तीच आई आतून तुटून पडते जेव्हा तिचे मूल एखाद्या विचित्र आजाराने किंवा समस्येने या जगात वावरते.
 
अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका मुलाचा जन्म जन्मतःच दोषाने झाला आहे, ज्याने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
 
वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मूल दिसत आहे जो जन्मतःच दोषाने जन्माला आला आहे. या मुलाला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या मुलाचा जन्म विचित्र जन्मजात दोषाने झाला होता, ज्याला पाहून स्वतः आईलाही हळहळ वाटली.
या व्हिडीओमध्ये या मुलाचा केवळ चेहराच नाही तर संपूर्ण शरीर पांढरे झाल्याचे दिसत आहे, ते पाहून असे वाटते की, मुलाची कातडी सिमेंटची आहे आणि मुलाच्या अंगावर अनेक भेगाही दिसतात. . डोळे आणि तोंड पूर्णपणे लाल आहेत आणि संपूर्ण त्वचा पांढऱ्या सिमेंट सारखी दिसत आहे.
 
मूल एखाद्या एलियन सारखे दिसते ज्याचे तोंड पूर्णपणे बंद होऊ शकत नाही आणि त्याचे डोळे उघडू शकत नाहीत. लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून या मुलाला बघता येत असून आश्चर्यकरत आहे.
 
या मुलाला असे काय झाले हा प्रश्न आहे. वास्तविक, या मुलाला हार्लेक्विन इचथायोसिस नावाचा आजार आहे, जो एक अनुवांशिक आजार आहे आणि त्याचा त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. या मुळे तो असा दिसत आहे. 
 
 


Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
परंपरागत शेती सोडून नवीन शेती पद्धतीचा अवलंब जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य