1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मार्च 2024 (13:24 IST)

तल्लफ अशी की उडत्या विमानात बीडी ओढली

दारु पिऊन अर्थात व्यसन करुन वाहन चालवण्याबद्दल आपण ऐकले असेल पण आता दारू पिऊन विमान उडवल्याचीही बातमी समोर आली आहे. अलीकडेच एका पायलटने दारू पिऊन विमान उडवल्याची बातमी समोर आली आहे. तर दुसरीकडे एका प्रवाश्याला बिडीची इतकी तल्लफ वाटली की काय सांगावे. काहीही विचार न करता महाशयाने उडत्या विमानात बिडी ओढली आणि इतर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात टाका. पण ही बीडीची तल्लफ आणि दारूची नशा पायलट आणि प्रवाशी दोघांनाही फारच महागत पडली आहे.
 
प्रवाशाने बीडी पेटवली
इंडिया टुडेच्या रिर्पोटप्रमाणे, 70 वर्षीय गफार अब्दुल रहीम इंडिगोच्या फ्लाइटने यूएईहून अहमदाबादला येत होते. मग हव्यासापोटी त्यांनी उडत्या विमानातच बीडी पेटवली. दहीच्या डब्यात राख टाकण्याचीही व्यवस्थाही केली. बीडी ओढत असताना विमानात धूर पसरला आणि लोकांना त्या बिडीचा वास येऊ लागला. विमानात बिडीचा वास कसा आला, असा प्रश्न उपस्थित झाला.
 
प्रकरण समजून घेण्यासाठी एअर होस्टेसने सर्व जागा शोधल्या. त्यानंतर अब्दुल विमानातच बीडी ओढत असल्याचे समोर आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याजवळ माचिसही सापडली. त्यानंतर विमानात बीडी आणि माचिस कशा आणल्या असा प्रश्न निर्माण झाला. पण हे अजूनही गुपितच आहे. बरं इतर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी विमानतळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि अब्दुलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
 
पायलटने दारू प्यायली
तर दुसरीकडे आणखी एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एअर इंडियाचा पायलट दारूच्या नशेत विमान चालवत होता. TOI च्या बातमीनुसार, एअर इंडियाने आपल्या एका पायलटला दारूच्या प्रभावाखाली असल्याबद्दल सेवेतून काढून टाकले आहे. आंतरराष्ट्रीय विमान उडवून पायलट भारतात येत होता. त्यानंतर त्याची अल्कोहोल चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली.
 
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पायलटवरही एफआयआर नोंदवल्याची चर्चा आहे. एअर इंडियाने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अशा गोष्टींबाबत झिरो टॉलरन्स असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.