गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (17:57 IST)

पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्थान कायम

देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान पटकावले आहेत. या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४ टक्के मतं मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच ही मते सहा टक्क्यांनी वाढली आहेत. 
 
सर्वेक्षणानुसार, पहिल्या पाचपैकी मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मते मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ टक्के मते मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 
 
योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) २४ टक्के मतं
अरविंद केजरीवाल (दिल्ली) १५
जगन रेड्डी (आंध्र प्रेदश) ११
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) ९
 उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) ७
 
इतर आठ मुख्यमंत्री
 
नितीश कुमार (बिहार) ७
एन पटनायक (ओडिशा) ६
केसीआर (तेलंगणा) ३
अशोक गहलोत (राज) २
बीएस येडियुरप्पा (केए) २
भूपेश बघेल (छत्तीसगढ) २
शिवराज चौहान (मध्य प्रदेश)
विजय रुपाणी (गुजरात) २