Dharma Sangrah

एसटी कर्मचाऱ्यांचे मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन

शुक्रवार, 8 जून 2018 (09:07 IST)
एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. काही कामगार संघटनांनी हा अघोषित संप पुकारला आहे. त्यामुळे भंडारा, सांगली या भागातील नागरिकांचा खोळंबा झाला असून सकाळी ७ वाजल्यापासून येथील एसटी स्थानकांतून एकही एसटी सुटलेली नाही. पगारवाढीच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. 
 
हा कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला संप नसून कर्मचाऱ्यांनी तो उत्स्फुर्तपणे पुकारला आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे येथील स्थानकांत बसेस उभ्या आहेत. राज्यातील अनेक भागात एसटी सेवा सुरळीत सुरु असली तरी काही संघटनांच्या दाव्यानुसार या संपाला उत्स्फुर्त प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईलवरील संदेशांमार्फत आणि पत्रकांमार्फत या संपाची माहिती पसरवण्यात येत आहेत.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: २७ जून रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा जारी

महाराष्ट्रात १५ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा धोका, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला

बारामती पाणीपुरवठा प्रकल्पांना गती, सुनेत्रा पवार यांचे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय!; जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

कॉकरोच जनता पार्टीकडून 'प्रधान गो बॅक' मोहिमेची घोषणा; २८ जून रोजी जंतर मंतरवर देशव्यापी आंदोलन

पुढील लेख
Show comments