बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 6 जून 2018 (15:07 IST)

‘काला’पाहण्यासाठी आयटी कंपनीतर्फे सुट्टी जाहीर

अखेर सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. केरळच्या एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कार्यकारिणीकडे एका दिवसाची सुट्टी मागितली. कर्मचाऱ्यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करत त्या कंपनीतर्फे खरोखरच एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाच्या ट्विट अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देण्यात आली.
 
केरळातील त्या आयटी कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीच्या पत्रकाचाच फोटो पोस्ट करत ही अनोखी आनंदाची बातमी त्याने पोस्ट केली. ”सर्व टीम मेंबर्ससाठी आम्ही एक आनंदाची बातमी जाहीर करु इच्छितो. सुपरस्टार रजनीकांत यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या चाहत्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या कंपनीतर्फे दिनांक ७ जून रोजी ‘काला’पाहण्यासाठी तुम्हाला कोणतीच अडचण येऊ नये यासाठी सुट्टी देण्यात येत आहे”,असं त्या पत्रकात लिहिण्यात आलं आहे.