दाट काळ्या मिशा असलेल्या एका नवजात बाळाचा जन्म, व्हिडीओ व्हायरल
कल्पना करा की नुकतेच एक बाळ जन्माला आले आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एक जाड, काळी मिशी आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसे शक्य..आहे. एका नवजात बाळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाळाच्या वरच्या ओठावर एक जाड, मिशीसारखी रचना दिसत आहे इतकेच नाही, तर त्याच्या हनुवटीवर थोडे केसही दिसत आहेत. बाळाचा चेहरा पाहून लोक चकित झाले आहेत आणि ऑनलाइन मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
पण या व्हिडिओने एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला आहे. एखादे बाळ खरोखरच इतक्या दाट मिशांसहित जन्माला येऊ शकते का, की हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि व्हिडिओ एडिटिंगचे काम आहे? सध्या, या व्हिडिओच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.
सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक नवजात बाळ हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले दिसत आहे. बाळाला एका कापडात गुंडाळले आहे आणि ते हळूवारपणे आपलआपली मान हलवते. एक महिला बाळाला हळुवारपणे स्पर्श करते आणि बाळ आपले डोळे उघडून किंचित प्रतिसाद देते. मात्र, लोकांचे लक्ष बाळाच्या हालचालींपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर जास्त केंद्रित झाले आहे. त्याच्या वरच्या ओठावर मिशीसारखी एक जाड काळी रचना स्पष्टपणे दिसत आहे. यामुळेच, यामागील सत्य काय आहे या विचारात लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
Baby born with mustache spark reaction online. ???????????????????????????? @grok is this real or AI?????? https://t.co/LFadLhpHjY
— PANSO QUEEN ???????? (@Niinameelah) October 23, 2026
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी बाळाच्या चेहऱ्याची तुलना एका मोठ्या व्यक्तीशी केली, तर काहींनी गंमतीने लिहिले की, बाळ जन्माला आल्याबरोबरच आयुष्यातील त्रासांना कंटाळलेले दिसते. त्याची मिशी पाहून, हा व्हिडिओ खरोखरच नवजात बाळाचा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला दुसरीकडे, अनेक वापरकर्त्यांनी दावा केला की हा एआय-निर्मित व्हिडिओ आहे. त्यामुळे, इंटरनेटवर या व्हिडिओवर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत: काहींनात्याचे आश्चर्य वाटले आहे, तर काही जण त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे, नवजात बाळांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर बारीक केस असू शकतात. गर्भाशयात बाळाच्या विकासादरम्यान, लॅन्युगो नावाचे एका विशेषचे मऊ केस वाढतात. हे केस बाळाच्या त्वचेवर दिसू शकतात आणि जन्मानंतर हळूहळू नाहीसे होतात.
चे मऊ केस वाढतात. हे केस बाळाच्या त्वचेवर दिसू शकतात आणि जन्मानंतर हळूहळू नाहीसे होतात. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जाड, गडद काळ्या मिशा , नवजात बालकांच्या अंगावर सामान्यतः दिसणाऱ्या बारीक केसांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे, केवळ व्हिडिओच्या आधारावर, एखादे बाळ खरोखरच अशा मिशीसह जन्माला आले होते, असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल.
व्हिडिओचे ठिकाण, मुलाची ओळख आणि त्याच्या कुटुंबाने किंवा डॉक्टरांनी त्याबद्दल काही माहिती दिली आहे की नाही, याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे, ही घटना खरी आहे की एआयने तयार केली आहे, याचा निश्चित निष्कर्ष काढणे अशक्य आहे.

