1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (14:48 IST)

पाकिस्तानी तरुणीचा बॉलिवूड गाण्यावर डान्स, Video Viral

pakistani girl dance viral video
Viral Video सोशल मीडियावर काही ना काही व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. डान्सचे व्हिडिओ बरेच व्हायरल होत असल्याचे दिसून येते. तुम्ही जर सोशल मीडियाचा सक्रिय वापरकर्ता असाल, तर लता मंगेशकर यांच्या मेरा दिल ये पुकारे आजा गाण्यावर एका मुलीचा नाचतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे आणि व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या मुलीचे नाव आयशा आहे. या व्हिडीओमध्ये एका लग्नसोहळ्याचे दृश्य दिसत आहे. सर्वांनाच ही डान्स क्लिप खूप आवडली आहे.
 
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आयशाने लूज फिट कुर्ता आणि पँट घातली आहे. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. ती खूप लक्षपूर्वक नाचत आहे. तिच्या लखलखत्या पावलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लता मंगेशकर यांच्या प्रसिद्ध गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर आयशा डान्स करत आहे. त्याचवेळी इतर अनेक महिलाही तिथे बसल्या होत्या, त्या आयशाचा परफॉर्मन्स पाहत होत्या. आयशानेही हातात कलिरे घातले होते, ज्यावरून ती नववधू आहे असे म्हणता येईल. या माहितीची अद्याप पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ आधी टिक टॉकवर शेअर करण्यात आला आणि नंतर तो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MANO (@oyee_ayesha)

हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच लिहिले आहे की कृपया वाईट कमेंट करू नका. आयशाने पाकिस्तानातच नाही तर भारतातही लोकांची मने जिंकली आहेत. आयशाच्या डान्सच्या काही स्टेप्स अगदी वेगळ्या आहेत.