मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 16 एप्रिल 2018 (17:18 IST)

जमिनीखाली वसलेले पाताळ लोक

patal lok in Australia
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराच्या वायव्येला एक हजार किलोमीटर अंतरावर एक अनोखे शहर आहे. या शहरात पब, प्राथ‍मिक शाळेपासून जनरल स्टोअर व फ्लाइंग डॉक्टर क्लीनिकपर्यंत सगळे काही उपलब्ध आहे. तिथे सुमारे 200 लोक राहतात. मात्र त्यांच्यातील बहुधा एकही तुम्हाला बाहेर नजरेस पडणार नाही. खरे म्हणजे तिथे सगळेच भूमिगत आहे. तिथे जमिनीखाली वेगळीच दुनिया वसलेली आहे. हे शहर व्हाइट क्लीप्स नावाने ओळखले जाते. ऑस्ट्रेलियाच्या या माइनिंग टाउनमध्ये खाणींच्या खोदकामाच्या काळातील अनेक खड्डे अस्तित्वात आहेत. आता त्यांनी घरांचे रूप धारण केले असून त्यात लोक राहतात. 1884 मध्ये तिथे पहिल्यांदा ओपल मिळाले होते व 1890पर्यंत ही जागा ओपलचे खाणकाम करणार्‍यांची एक छोटी वस्ती बनली होती. उन्हाळ्यात तिथले तापमान 50 अंशावर धडकते. अशा स्थितीत जमिनीखालील खड्‌ड्यांमध्ये लोकांनी थंडावा व शांतीसाठी आपली घरे बनविली. त्याकाळी तिथे इमारती बांधण्याची सामग्री आणणे अवघड व महागडे होते. त्यामुळे खाण कामगारांनी देशी अवजारांनी आपली घरे तयार केली. तिथली जमीन सँडस्टोनपासून बनलेली असल्याने ती खचण्याचा अजिबात धोका नाही. ती अतिशय मजबूत आहे. हिवाळ्यात तिथे तापमान शून्यापर्यंत खाली उतरते.