शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (13:54 IST)

लग्नात सोन्याचा पाऊस; पाहुण्याची झुंबड, व्हिडीओ व्हायरल!

Gold coin
लग्न सोहळा म्हटले की मस्ती मज्जा असते. लग्न सोहळ्याचे अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. लग्नात काही ठिकाणी मिरवणुकीत पैसे उडवतात आणि काही लोक ते लुटतात. पण लग्न समारंभात कधी सोन कोणी उडवले तर काय होणार. आपण म्हणू एकतर सोन उडवणारा पक्ष खूपच श्रीमंत असावा. पण असं घडले आहे एका लग्न सोहळ्यात. 

या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होत आहे. या मध्ये एका व्यक्तीने चक्क सोन्याची नाणी उडवली आहे. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मध्ये एक महिला आणि एक पुरुष लग्नाच्या वेळी सोन्याची नाणी उडवतात आहे. व्हिडीओ मध्ये नववधू देखील उभी आहे. तिच्या समोरून सोन उडवतात आहे. आणि ते लुटण्यासाठी जमलेल्या पाहुण्यांची झुंबड दिसत आहे. 

हा व्हिडीओ मुहम्मद अहमद नावाच्या युजर ने सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओ मध्ये एक महिला आणि एक पुरुष लग्नाच्या वेळी सोन्याचा वर्षाव करत आहे. त्यामध्ये एक मुलगी मधोमध उभी आहे. आणि तिच्या जवळ उभे असलेले लोक सोन्याचे कार्ड लुटण्यासाठी गर्दी करत आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी बघितला हे तर 20 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे अद्याप समजू शकले नाही. 
 
 Edited by - Priya Dixit