1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (15:36 IST)

ट्रॅफिकमध्ये व्यक्तीकडून कारच्या दारात लघवी

traffic
लघवी करणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि ती करण्याची गरज केव्हा ही आणि कधीही भासू शकते आणि अशा वेळी लोक शौचालय शोधतात किंवा भारतातील एकाकी जागा शोधतात, जिथे कोणाचंही लक्ष न जाता लघवी करता येते.सहसा लोक निर्जन रस्ता किंवा लोकांची कमी वर्दळ पाहून रस्त्याच्याकडेला किंवा भिंतीवर लघवी करतात. पण एका ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेल्या व्यक्तीने चक्क ट्रॅफिक मध्ये स्वतःचा कारचे दार उघडून कारच्या दारात लघवी करण्याचे प्रकार घडले आहे.या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  
हे प्रकरण आहे एका ठिकाणी लागलेल्या ट्रॅफिक जॅम चे या व्यक्तीचे वाहन .ट्रॅफिक मध्ये अडकले आहे. एकाएकी तो कारचे दार उघडतो आणि कारच्या दारावरच्या लघवी करू लागतो. या व्यक्तीने सर्व लोकांच्या समोर असं पाऊल उचलल्याने त्याच्या या कृत्याची जोरदार चर्चा होत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकां समोर या व्यक्तीने लघवी केली. या व्हिडिओला लाखो व्युज मिळाले आहे.

अनेकानी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या व्यक्तीच्या कृतीला घृणास्पद म्हटले आहे. तर काहींनी त्याची बाजू घेऊन कदाचित त्याला लघवीवर नियंत्रण करता आले नाही तर काहींनी त्याला मधुमेह असावा असे लिहिले आहे. 
 

Edited by - Priya Dixit