रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (18:48 IST)

रस्त्यावर पैशांचा पाऊस; 500 चे नोट रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल !

Hyderabad’s Charminar Viral Video: बऱ्याचदा अनेक वेळा आपण लग्नसोहळ्यात रस्त्यावर पैसे उडवताना बघितले असणार. बऱ्याचदा चित्रपट किंवा एखाद्या सीरिअलच्या शुंटिंग साठी देखील रस्त्यावर पैसे उडवतात. पण सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये 10 ,20 , 50 , 100 नाही तर चक्क एक माणूस 500 रुपयांच्या नोटा उडवत आहे. 
 
हा व्हिडीओ  हैदराबादमधील चार मिनारचा आहे.या ठिकाणी एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात एका मिरवणुकीत 500 रुपयांच्या चलनी नोटा हवेत उडवत आहे. या व्यक्तीने दोनदा 500 रुपयांचे नोटांचे बंडल उडवले. काही लोकांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केली. 

व्हायरल व्हिडीओ मध्ये कार, मोटारसायकलचा ताफा गुलजार हौजला थांबलेला दिसत आहे. सर्वांनी कुर्ता आणि शेरवानी घातली असून ते देखील मिरवणुकीत आहे. त्यापैकी एक व्यक्ती गुंजत कारंज्याकडे जातो आणि 500 रुपयांच्या नोटांचे बंडल हवेत उडवतो. अचानक एवढा पैशांचा पाऊस होत असताना पाहून काही स्थानिक नागरिक पैसे घेण्यासाठी तिथे पोहोचले. 
 
व्हिडीओ व्हायरल होतातच या घटनेची माहिती मिळतातच पोलीस सतर्क झाली आणि चारमिनारच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बघून नोटा फेकणाऱ्या माणसाचा शोध घेत आहे. पडताळणी केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे चार मिनारचे निरीक्षक यांनी सांगितले