मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (09:42 IST)

अनोखा विक्रम : अवघ्या ३ मिनीटांत बोलून दाखविले मतदारसंघ

rajesh shirodkar
पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या राजेश शिरोडकर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. यामध्ये त्यांनी तीन मिनेटे आणि काही सेकंदात देशातील एकूण 543 लोकसभा मतदारसंघांची नावं भराभर बोलून दाखवली. अर्थात, ही नावं कुठेही न पाहता बोलून दाखवली, म्हणजेच 543 लोकसभा मतदारसंघात राजेश शिरोडकरांच्या अगदी तोंडपाठ होती. राजेश शिरोडकर हे पेशाने शास्त्रज्ञ आहेत. या विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ या संस्थेनेही घेतली आहे. 
 
विशेष म्हणजे, राजेश शिरोडकर यांच्या मुलाच्या नावावरही विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यांच्या 10 वर्षी मुलाच्या नावावर दोन विक्रमांची नोंद आहे. प्रीत असे त्यांच्या मुलाचे नाव असून, त्याने 96 सेकंदात 193 देशांची नावं भराभर बोलून दाखवली होती.