शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (08:39 IST)

आर्ची निघाली परीक्षेला, महाविद्यालयाने मागितला बंदोबस्‍त

सैराटची आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू ही इयत्ता १२ वीची परीक्षा देणार आहे. गुरुवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्‍यामुळे ती शिकत असलेल्‍या महाविद्‍यालयाने पोलिसांकडे बंदोबस्‍ताची मागणी केली आहे. 
 
परीक्षेच्या काळात रिंकूच्‍या परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालयाने केली आहे. रिंकू ही सोलापुरातील टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देणार आहे. यावेळी येथे तिच्‍या फॅन्‍सची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सुरक्षेच्‍या कारणास्‍तव पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. जय तुळजाभवानी महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी सातपुते यांनी पोलिस ठाण्याला पत्र लिहिले आहे.