बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (10:20 IST)

आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा

राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा दिला आहे. यामुळे राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. नवीन स्वायत्तता घोषित केलेल्या महाविद्यालयांमध्ये तीन महाविद्यालये ही मुंबईतील असून इतर दोन नागपूर आणि अमळनेर येथील आहेत. मुंबईतील या तीन महाविद्यालयांमुळे मुंबईतील स्वायत्त महाविद्यालयांची संख्या २३ वर पोहोचली आहे.
 
स्वायत्तता मिळालेली महाविद्यालये अशी 
पोदार महाविद्यालय - मुंबई, प्रताप महाविद्यालय - अमळनेर, निर्मला निकेतन सोशल वर्क महाविद्यालय - मुंबई, एम. एम. शाह महाविद्यालय - मुंबई, तिरपुडे महाविद्यालय - नागपूर.