गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (20:41 IST)

सासऱ्यांना निजलेलं पाहून सुनेने घराला आग लावली, व्हिडीओ व्हायरल!

fire at home
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये एका सुनेने रागाच्या भरात येऊन आपल्या घराला पेटवले आहे.मुख्य म्हणजे त्याने आपल्या सासऱ्यांना झोपेत पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.  
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये संतापलेल्या सुनेने स्वतःच्याच घराला आग लावली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 
@ShoneeKpoor नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटर (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे
 

महिलेने हे असे का केले त्याचे कारण जाणून धक्काच बसणार, झाले असे की सुनेला आपल्या मुलाला जेऊ घालायचे होते आणि सासऱ्याने मुलाला झोपवण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि सुनेला राग आला आणि तिने सासऱ्यांच्या पांघरुणाला पेटवले. 
आता पर्यंत  हा व्हिडीओ दोन लाख लोकांनी पहिला आहे. युजर्स हा व्हिडीओ पाहून चांगलेच संतापले आहे. 
 



Edited by - Priya Dixit