शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. नरेंद्र मोदी
Written By
Last Updated : गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (16:37 IST)

शाळांमध्ये मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ लघुपट दाखवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा आदेश महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. आता याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये पार पडणार आहे. याआधी सदरचा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिला होता. 
 
मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केलेला ३२ मिनिटांचा हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांना अशा प्रचारतंत्रात का ओढले जात आहे, असा सवाल काही शिक्षकांनी केला आहे. काही जिल्ह्य़ातील केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील मंगळवारी elearning. parthinfotech.in  या संकेतस्थळावर हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तो सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.