बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (17:26 IST)

मुतखड्यावर प्रभावी औषध, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ संशोधन

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मुतखड्याच्या आजारावर प्रभावी औषध शोधल्याचा दावा केलाय.. या औषधाला मान्यताही मिळाली असून अशा प्रकारचं औषध बनवणारं नांदेडचं विद्यापीठ राज्यातलं पहिलंच विद्यापीठ ठरलंय.
 
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ जैवशास्त्र संकुल, औषधी वनस्पती आणि भुमी औषधनिर्मिती कंपनी वसमत तसेच कलस औषध निर्मिती कंपनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा संशोधन प्रकल्प राबवला गेला.10 वर्षे त्यावर संशोधन करण्यात आले.प्रयोगशाळेतील उंदरांवर आणि त्यानंतर 100 रुग्णांवर औषधाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. अन्न औषध प्रशानाची परवानगी तसेच भारत सरकारकडून त्याचे पेटेंट घेण्यात आले.आता डिसोकॅल नावाने अतिशय माफक दरात ही औषधी बाजारात आणली जात आहेत. डिसोकॅल हे औषध गोळ्यांच्या रुपात उपलब्ध करण्यात आले आहे. कमी पैश्यांमध्ये उपचार होणार असल्याने मुतखड्याच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.