मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (16:52 IST)

अंगावरून ट्रेन गेली तरीही मुलगी फोनवर बोलण्यात बिझी, पाहा व्हिडीओ

मोबाईल फोन वर गॉसिप करणे अंगाशी येते. बऱ्याच लोकांना वाटेतून जाताना फोन वर बोलण्याची सवय असते. बऱ्याचदा फोनवर बोलत चालताना लोक कधी खांबाला धडकतात, तर कधी खड्ड्यात पडतात. पण आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाला आहे. त्यात एक मुलगी फोन वर गप्पा करण्यात व्यस्त आहे. ती मुलगी फोन वर बोलता बोलता ट्रेनच्या रुळावर जाऊन पोहोचते आणि तेवढ्यात एक मालगाडी समोरून येताना दिसते. ही मुलगी प्रसंगावधान राखून रुळावर झोपते.ट्रेन  तिच्या अंगावरून निघते. अक्खी मालगाडी अंगावरून गेल्यावर देखील ती रुळावर पडलेली मुलगी फोनवर बोलत असते. मालगाडी अंगावरून गेल्यावर लोकांनी जे बघितले ते धक्कादायक होते. ती मुलगी  सुखरूप उठून उभी राहते आणि फोन वर तिचे बोलणे ऐकू येते. " नाही यार, आता जगण्याला काहीच अर्थ नाही"  

हा व्हिडीओ कुठला आहे हे सांगता येऊ शकत नाही.पण हा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 
हा व्हिडीओ हजारो लोकांनी बघितला आहे.युजर्स या व्हिडिओवर कमेंट्स करत आहे.काहींनी हिला निडर मुलगी असे म्हटले आहे.