हा आहे रियल बाहुबली, व्हिडीओ व्हायरल
फोटो साभार- सोशल मीडिया
साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली कोण विसरू शकेल? जर तुम्हाला चित्रपटांची आवड असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटात बाहुबली बनलेल्या प्रभास रावला हत्तीच्या सोंडेवर अनोख्या पद्धतीने चढताना आपण पाहिले असेलच. चित्रपटातील या सीनचे खूप कौतुकही झाले, पण खऱ्या आयुष्यातही असे कोणी करू शकते का? नाही , चित्रपटातील हा सीन खऱ्या आयुष्यात करणे प्रत्येकाला शक्य नसते, पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून आपल्याला ही मानावेच लागणार की, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती वास्तविक जीवनातील बाहुबली आहे.
या व्हिडीओ मध्ये बाहुबली स्टाईलमध्ये एक माणूस हत्तीवर चढताना दिसत आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल होताना पाहून लोक केवळ आश्चर्यचकित झाले नाहीत तर राजामौली यांना बाहुबली 3 बनवण्याची मागणीही करत आहेत. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. यासोबत कॅप्शन लिहिले आहे - हे अगदी बाहुबली 2 च्या प्रभास रावसारखे केले आहे.
शेअर केल्यापासून, या व्हिडिओला आतापर्यंत 16.5k व्ह्यूज मिळाले आहेत.या व्हिडीओला लोकांनी प्रतिसाद दिला आहे आणि हा व्हिडीओ लोकांना आवडला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस हत्तीच्या सोंडेच्या साहाय्याने त्यावर चढतो आणि हा पराक्रम करून सर्वांना आश्चर्यचकित करतो, त्यामुळेच हा व्हिडिओ पाहून लोक त्याला खऱ्या आयुष्यातील बाहुबली म्हणत आहे